रत्नागिरी | पांगरी येथील पुलाच्या खाली सापडले एक वर्षाचे बेवारस बालक

रत्नागिरी वार्ता -: 25 जानेवारी रोजी संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथील एक बस थांब्याजवळ पुलाच्या खाली विव्हळत पडलेले सुमारे एक वर्षाचे बेवारस बालक सापडले आहे. पांगरी येथील हनुमान स्टॉपजवळील गाव पऱ्यात ४ दगडांच्या मधोमध हे बालक सापडले.

ते तेथे ४ दिवस असावे, असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. कडाक्याच्या थंडीने गारठल्याने आणि रडून रडून त्याचा घसा बसला होता. परंतु ४ दिवस मुलाच्या रडण्याचा आवाज येत असल्याची चर्चा चालू झाली. प्राण्यांचा आवाज किंवा अजून काहीतरी असेल म्हणून येथील ग्रामस्थांनी दुर्लक्ष केले. मात्र आज सकाळी सरपंच सुनील म्हादये ग्रामपंचायतीत गेले असता त्यांना याविषयी चर्चा ऐकायला मिळाली. त्यांनी लगेच पोलीस पाटील आणि ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी धाव घेतली. तेथे एक बालक विव्हळत होते. ती मुलगी आहे. गेल्या ४ दिवसांपासून अन्नपाण्यावाचून तडफडत होते. त्यातच थंडीने ते गार पडले होते. या बालकाच्या तोंडून आवाजही फुटत नव्हता. ते बेशुद्धावस्थेत दिसत होते.

सरपंच, ग्रामसेवक अखिलेश गमरे, पोलीस पाटील श्वेता कांबळे, ग्रामस्थ तसेच वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे मंगेश राऊत, सीएचओ सोनाली चव्हाण, आशा वर्कर दीक्षा जाधव यांनी बालकाला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दिनेश मुळ्ये, गावप्रमुख प्रभाकर तेगडे, दत्ताराम जाधव, प्रदीप म्हादये, शिवराम दुडये आणि ग्रामस्थ यांनी सरकारी यंत्रणेची वाट न पाहता प्राथमिक उपचार सुरू केले.

घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी देवरूख पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार जावेद तडवी आणि सहकारी दाखल झाले. पोलीस या घटनेचा तपास करत असून नेमकी ही घटना काय आहे, याचा कसून तपास करण्यात येत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!