नांदगावच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय खेळाडूंची रक्ततूला ; बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त युवासेनेचे आयोजन

रवी मारोटकर ब्युरो चीफ/

१३२ रक्तदात्यांनी केले विक्रमी रक्तदान


नांदगाव खंडेश्वर/शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिना निमित्त युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते यात १३२ रक्तदात्यांनी नांदगावच्या इतिहासात विक्रमी रक्तदान करून पहिल्यांदाच राष्ट्रीय खेळाडू व मतदार जनजागृती अभियानाची ब्रँड अँम्बीसिडर मंजिरी अलोने हिची रक्ततूला करण्यात आली.

पहा रक्ततुला व्हिडिओ


शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याकरिता रक्ताचा तुटवडा पडू देऊ नका अशे आव्हान शिवसैनिकांना राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे यांनि केले आहे त्या आवाहना नुसार पर्यावरण मंत्री ना आदित्य ठाकरे व युवा सेनेचे सरचिटणीस वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते .

यात रक्तदान शिबीर स्थानिक गजानन महाराज मंदीर येथे आयोजित केले होते बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली वाहून शिबिराला सुरवात झाली यावेळी जास्त वेळ रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला यावेळी १३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले व शहरातील विविध पाच वार्डात नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बेंच बाळासाहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ सुनील गुरमुळे यांच्या वतीने देण्यात आले .

पहा व्हिडिओ

रक्ततुला या कार्यक्रमाला तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, गटविकास अधिकारी सतीश खानंदे, ठाणेदार हेमंत ठाकरे, छत्रपती पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव, माजी सरपंच मधुकर कोठाळे, विलास पाटील सावदे,अरुण लहाबर, निलेश ईखार,छाया भारती, रेखा नागोलकर, इत्यादी उपस्थित होते रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरीता सरपंच निखिल मोरे,आशिष हटवार, अक्षय राणे, शुभम सावरकर, मंगेश पवार, मंगेश सुरोसे, अभय बणारसे,सुनील गुरमुळे, गुणवंत चांदूरकर,अभिजित तायडे, रोशन चौधरी, शुभम रावेकर, रोशन भातुलकर, विक्की बविस्थळे, राहुल बनकर, मनोज बणारसे, पवन शिरभाते, पवन शिरभाते, शुभम साखी, अमोल धवस,दिनेश रघुते,आकाश काकडे, अक्षय तुपटकर, शुभम सोळंके, मंगेश कांबळे, अजय काळे, गौरव देशमुख, प्रतीक नालट,भारत तिरमारे, मंगेश दांडगे, श्रीकांत कोठाळे,वैभव वैश्य, प्रतीक रिठे, मनोज ढगे, अमन मानकर, अक्षय मुके, ओम राऊत,आशिष भाकरे,राहुल मुके, आकाश सैरिसे इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
महिलांचा रक्तदान शिबीरात सहभाग छाया भारती,स्वप्नाली उदावंत,मोना काजे, रेखा नागोलकर या महिलांनी रक्तदान केले मुस्लिम बांधवांनि सुद्धा रक्तदान केलेतसेच पोलीस कर्मचारी, तलाठी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी रक्तदान शिबीरात सहभाग घेतला होता

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!