तहसिलदार शितल बंडगर यांनी घेतला ‘सुंदर आपले कार्यालय’ ऊपक्रमाचा आणी प्रजासत्ताकदिन कार्यक्रमाचा आढावा

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-येणार्‍या प्रजासत्ताकदिनाच्या नियोजनाचे तसेच ‘सुंदर आपले कार्यालय’ऊपक्रमाचा आढावा तहसिलदार शितल बंडगर यांनी घेतला असुन शासकीय नियमाने प्रशासन चालवण्यासाठी कटिबध्द असलेल्या महसुल कर्मचार्‍यांना सुचनाही दिल्या आहेत.

तालुक्याचे तहसिल कार्यालय म्हणजे महसुलचा कणा असतो.परंतु या कार्यालयाला माञ अस्वच्छतेचे ग्रहण लागले होते.कर्मचारीही लेटलतिफ झाले होते.मनमानीपणे वागुन नाहक जनतेला ञास होत होता.वेळेच्या आधिच कार्यालयातुन निघुन जाण्याचे प्रकारही वाढले.याबाबीची दखल काही दिवसापुर्वीच रुजु झालेल्या तहसिलदार शितल बंडगर यांनी घेवुन कर्मचार्‍यांना सुचना दिल्या व पारदर्शक शासनप्रणालीसाठी सर्वांनी जनताकेंद्रित कामे करण्यावर भर देण्याचेही सांगीतले.

कर्तव्यदक्ष ना.तहसिलदार रवि राठोड,दिलीप चौधरी,वाडेकर यांनीही कार्यालय सर्वांग सुंदर आणी स्वच्छ राहावे जेणेकरुन परिसर चांगला दिसेल आणी लोकांची वेळेत कामे होतील यावर भर दिला.तहसिलचा चेहरामोहरा बदलत असुन या तहसिल इमारतीला रंगरंगोटी देवुन विभागही स्वच्छ आणी सुंदर बनवन्याचे काम सुरु आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!