प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज ;जाणून घ्या सविस्तर

अवघ्या काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला आहे.(Republic Day 2022)आतापर्यंत भारतात प्रजासत्ताक दिन हा 24 जानेवारीपासून साजरा करण्यात येत होता मात्र, आता 24 जानेवारीपासून साजरा करण्यात येणारा प्रजासत्ताक दिन हा 23 जानेवारीपासून साजरा करण्यात येत आहे.भारत हा देश जैवविविधता संपन्न असून महाराष्ट्रातील चार प्रमुख भागांमध्ये जैवविविधता दिसून येते. वातावरणातील होणाऱ्या बदलांचा विचार करता पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र आघाडीवर आहे.

दिल्लीच्या राजपथावर झळकण्यासाठी 12 राज्यांची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्राचं वैभव पुन्हा एकदा दिल्लीतील राजपथावर दिसणार आहे.दरवर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर सांस्कृतीक कार्यक्रमांचा सोहळा पार पडतो. यावेळी आपल्या भारतीय सैन्याकडून कला कौशल्यासह आपल्या सैन्याची ताकद दाखवण्यात येते यासह प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे दर्शन होत असते.

आता तर थेट दिल्लीमध्ये राजपथावर महाराष्ट्रातील जैवविविधतेची मानके सादर होणार आहेत. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर चित्ररथ सहभागी होणार आहे

त्यामध्ये राज्यप्राणी आणि भिमाशंकर येथील शेकरूही दिसणार आहे. ही मराठी माणसांसाठी एक अभिमानाची गोष्ट ठरली आहे. हा चित्ररथ सांस्कृतिक कला कार्य संचालनालयाकडून तयार केला आहे आणि त्यांची ही संकल्पना आहे.

खरंतर संपूर्ण भारतात खूप जैवविविधता नटलेली आहे. त्यातही आपल्याकडील सह्याद्रीमध्ये सर्वाधिक आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहेत. शेकरूसोबतच चित्ररथामध्ये ‘कास पठार’चाही समावेश आहे. युनेस्कोची मान्यता असलेल्या सूचीमध्ये सातारा येथील ‘कास पठार’ आहे. ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक तिथे जातात.

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ हा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. तसेच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दरम्यान महाराष्ट्राची जैवविवीधता ही यंदाच्या चित्ररथाची वैशिष्ट्य असणार आहे. महाराष्ट्राचा हा चित्ररथ नेमका कसा आहे याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. यंदाच्या राजपथावरील महाराष्ट्राच्या विशेष चित्ररथाबद्दल तसेच याची वैशिष्ट्य काय आहेत जाणून घेऊयात

महाराष्ट्राची जैवविविधता रापथावर झळकणार

प्रजासत्ताक दिनाला राजपथावर जी परेड असते त्यामध्ये राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ झळकणार आहे. महाराष्ट्रातील जैवविविधता ही यंदाच्या चित्ररथाची थिम आहे. या चित्ररथावर महाराष्ट्र असं मध्यभागी लिहण्यात आलं असून यावर ब्लू मॉमॉन फुलपाखरू देण्यात आले आहेत. सांस्कृतिक विभागेच सचिव चौरे यांनी चित्ररथाबद्दल माहिती दिली आहे.

चित्ररथाची वैशिष्ट्ये

चित्ररथावर ब्लू मॉमॉन राज्याने घोषित केलेलं पहिलं फुलपाखरू असून हे भिमाशंकरमध्ये आढळणारे फुलपाखरू आहे. अशा प्रकारचे 8 फुलपाखरू चित्ररथावर असतील. तसेच चित्ररथावर कास पठार यला मिळेल. विदर्भामध्ये आढणारा पट्टेरी वाघ चित्ररथावर स्वार आहे.त्यातील विविध फूल आणि सरडा सुपरबा ही जात दाखवण्यात आले आहे. राज्य प्राणी शेखरुची प्रतिमा देखील दाखवण्यात आली आहे. हा प्राणी महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. राज्याचा पक्षी हरियाल त्याला पिवळं कबुतर म्हणतात ते दाखवण्यात आले आहे. वाघाला , माळढोक पक्षी , नव्याने सापडलेला खेकडा गुबर नटोरिया ठाकरियाना देखील दाखवण्यात आला आहे. आजादी का अमृत मोहोत्सवाअंतर्गत महाराष्ट्राने अतापर्यंत प्रर्यावरणात केलेली प्रगती यात मांडण्यात आली असून चित्ररथ साकार करण्यासाठी ‘शूभ आर्ट’ नागपूर येथील टिमला चित्ररथाचे टेंडर देण्यात आले आहे. चित्ररथ साकारण्यासाठी तब्बल 30 लोकांनी यासाठी मेहनत केली आहे.

असा आहे चित्ररथ –

  1. दर्शनी बाजूस भव्य ‘ब्लू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंचीची देखणी प्रतिकृती
  2. दीड फूट दर्शविणारे राज्यफूल ‘ताम्हण’ याचे अनेक गुच्छ आणि त्यावर इतर छोट्या फुलपाखरांच्या प्रतिमा
  3. १५ फूट भव्य असा ‘शेकरू’ राज्यप्राणी
  4. कास पठाराची प्रतिमा
  5. दर्शनी भागात कास पठारावर आढळणारा सरडा ‘सुपारबा’ ३ फूट उंच, त्यामागे राज्यपक्षी हरियालची प्रतिमा
  6. चित्ररथाच्या अंतिम भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिमा व त्यामागे सुमारे १४ ते १५ फूट उंचीपर्यंत राज्यवृक्ष आंबा वृक्षाची प्रतिमा

यंदाच्या 12 राज्याच चित्ररथासाठी सिलेक्शन झालं असून यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश करण्यात आला असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाची बाब मानली जातेय.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!