समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नावाच्या बोर्डाचे अनावरण

रवि मारोटकर ब्युरो चीफ

अमरावती :- २३ जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती दिनानिमित्त आयोजन
नांदगाव खंडेश्वर/ २३ जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औवचित्ताने युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी तालुक्यातुन गेलेल्या समृद्धी महामार्गावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्ग बोर्डाचे अनावरण माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब राणे यांच्या हस्ते केले
सन २०१७ मध्ये नागपूर मुंबई महामार्गाचे काम सुरू झाल्यावर राज्यात सर्वात प्रथम नांदगाव तालुक्यात युवा सेनेने शिवणी येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करीत त्याचं वेळी बोर्ड लावले होते याच दरम्यान सदर महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी राज्यभर जोर धरू लागली मागील वर्षी राज्य सरकारने बाळासाहेबांचे नाव अधिकृत जाहीर केले

पहा व्हिडिओ

म्हणून आज युवा सेनेच्या वतीने शिवणी रसुलापूर येथून अमरावती यवतमाळ रोडवरून गेलेल्या पुलाजवळ बाळासाहेब ठाकरे महामार्ग असा मोठा बोर्ड लावून आज त्याचे अनावरण करण्यात आले .

यावेळी बाळासाहेब राणे, माजी सरपंच मधुकर कोठाळे,शहर प्रमुख अरुण लहाबर, महिला आघाडीच्या रेखाताई नागोलकर, रेवतीताई परसंनकर,उपतालुका प्रमुख अक्षय राणे, सरपंच निखिल मोरे, माजी तालुका प्रमुख पुरुषोत्तम बनसोड, अमोल पोहेकर,पवन डोफे,हरिदास लीचडे,मंगेश दांडगे, आशिष हटवार, सुमित मेहेरे, नरेश कारमोरे, आशिष हटवार,शुभम सावरकर, अजय काळे,भुमेश्वर गोरे,अभय बणारसे, गुणवंत चांदूरकर,लीलाधर चौधरी, अमोल गभने,श्रीकांत कोठाळे, भारत तिरमारे, शुभम देशमुख, दिनेश रघुते,पंकज हटवार,लिलेश्वर बनसोड, दीपक मेश्राम, प्रणव शेंडे, आशिष खंगर,गणेश मेश्राम, यश रघुते, रौनक लीचडे,शुभम रावेकर, अक्षय हिवराळे, निलेश मारोटकर,प्रेम हिवराळे,दिपक वानखडे, पिंटू भुजडणे, रुपेश मेंढे, ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!