स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये आज शनिवारी झालेल्या आठवडे बाजारात कांद्याची आवक १००० क्विंटलने वाढून कांद्याचे भावात २००रुपयांची वाढ झाली.तसेच तळेगाव बटाट्याची आवक १४०० क्विंटलने वाढल्याचे पाहायला मिळाले.त्यामुळे बाजारात बटाट्याचे भावात घसरण होऊन ३०० रुपयांनी खाली आला.परंतु वटाणा,टोमॅटो, हिरवी मिरची,गाजराची आवक भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणात होत आहे.आज भाजीपाला बाजारात कोथिंबीर ३४,५३० व मेथीच्या ३१,६५० जुड्यांची मोठी प्रमाणात आवक भाजीपाला बाजारात झाल्याने मातीमोल भाव शेतकऱ्यांना मिळाला.

भाजीपाला बाजारात मेथीच्या भाजीला कमाल ६ रुपयांपर्यंत, कोथिंबीर जुडीला ५ , शेपु भाजीला १० रुपये,पालक भाजीला अवघा ७ रुपये दर पाहायला मिळाला.मात्र हिरवी मिरची व टोमॅटोची आवक होऊन देखील भाव कडाडले. भाजीपाला बाजारात मेथी,कोथिंबीर, भाजीला दरात मोठी घसरण झाल्याने उत्पादन खर्च, गाडी भाडे ,औषधे मजुरी देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांना नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी बाजारात आणलेली मेथीची भाजी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.मात्र काही शेतकऱ्यांनी किरकोळ बाजारात मेथी कोथिंबीर विक्री केल्याने १०रुपये दर मिळालेला पाहायला मिळाला.

खेड तालुक्यातील ग्रामीण भागात रब्बी हंगाम संपल्यावर लावलेला कांदा,बटाटा पिकाची खराब हवामान,अवकाळी पाऊस, यामुळे मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता. काही शेतकऱ्यांनी उशिरा केलेल्या लागवडीचा कांदा,बटाटा सध्या चाकण मार्केटयार्डमध्ये शेतकरी घेऊन येत आहेत.त्यामुळे कांदा बटाट्याची मोठ्या प्रमाणात आवक दिसत आहेत. मागील शनिवारच्या तुलनेत कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचा भाव वधारून कमाल २७०० रुपयांवरून किमान १००० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल पर्यंत मोठी वाढ होऊन पोहचला.व तळेगाव बटाट्याची भाव देखील प्रतिक्विंटलने 300 रुपयाने कमी होऊन कमाल १२०० ते ७०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल काही प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच चाकण भाजीपाला मार्केट यार्डमध्ये ,हिरवी मिरची,कोबी,फ्लॉवर, वटाणा,गाजर,टोमॅटो मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला मिळाली.

तसेच भाजीपाला बाजारात हिरवी मिरची,गवार, वांगी, शेवगा भाजीची आवक घटल्याने भाव कडाडले आहेत.लसणाची देखील ४४ क्विंटल आवक होऊन भाव स्थिर राहिले.,आज झालेल्या आठवडे बाजाराची एकुण उलाढाल ३० लाख रुपये इतकी झाल्याचे पाहायला मिळाली.
