जीवन विकास संस्थेद्वारा सेंद्रिय शेतीवर आधारित प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

दर्यापूर – महेश बुंदे

जीवन विकास संस्थेद्वारे गेल्या दोन दशकापासून समाजातील गोर गरीब तळागाळातील लोकांकरीता सामाजिक उपक्रम राबविले जात असून समर्थ प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या ग्रस्तकुटुंब, विधवा महिला, घटस्फोटीत महिलांसाठी विविध प्रशिक्षण राबविण्यात येत असून कृषीविषयक सेंद्रिय शेती वर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजी शिंगणापूर या गावी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून दर्यापूर तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदीप ढवळे उपसरपंच, माजी सरपंच गजानन पाटील, माजी शिक्षक रामदास फुले, सामाजीक कार्यकर्ते केशव बेलसरे, ग्रामपंचायत सदस्य जीवन बेलसरे, पोलीस पाटील राहुल बावणेर, ग्रामपंचायत सदस्या शांताबाई उंबरकर, कृषीसखी शीतल वरहेकर, बनसोड मॅडम, समर्थ प्रकल्पातील शिंगणापूर, जसपुर,थिलोरी, या गावातील पात्र महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या. तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार यांनी उपस्थित सर्व महिलांना सेंद्रिय शेती म्हणजे काय, सेंद्रिय शेतीचे फायदे काय, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, नाडेप कंपोस्ट उत्पादन, सेंद्रिय उत्पादन युनिट, जीवांमृत, लमित अर्क, याविषयी विस्तृत अशी माहिती देण्यात आली.

तसेच प्रमूख अध्यक्ष यांनी समर्थ प्रकल्पा बद्दलचे आपले मत व्यक्त केले. तसेच सेंद्रिय शेती बद्दल जीवामृत, लमीत अर्क तयार करून महिलांना प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवन्यात आला. रासायनिक खते वापरून शेती करण्यापेक्षा सेंद्रिय खते वापरून कमी खर्चात जास्त उत्पादन कशाप्रकारे घेता येईल या बाबत सर्वाना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन जीवन विकास संस्था ,समर्थ प्रकल्प तालुका समनव्यक मनीषा निवृत्ती दुदंडे यांनी केले. फादर जोस कुन्नापली,कार्यकारी संचालक जीवन विकास संस्था यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कार्यकम पार पडला.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!