Post Views: 397
उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
दर्यापूर – महेश बुंदे
कोरोना महामारीमुळे पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमावर संकट आले असून त्यामध्ये शासकीय कार्यक्रम सुद्धा सुटले नाहीत. दर्यापूर उपविभागीय कार्यालयातर्फे होणारा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन हा मोठया उत्साहात जिल्हा परिषद कन्या शाळा प्रांगणात होत असते मात्र मागील २ वर्षांपासून हा कार्यक्रम मर्यदित मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे.
त्या प्रमाणे यावर्षी सुद्धा वा. का धर्माधिकारी मराठी नगर परिषद शाळा परिसरात ( जुनी जिल्हा परिषद कन्या शाळा प्रांगण ) साध्या पद्धतीने उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याची माहिती तहसीलदार योगेश देशमुख यांनी दिली. प्रजासत्ताकची प्राथमिक तयारी करण्यासाठी तहसीलदार योगेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार गाडेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती सुधीर अरबट, दर्यापूर ठाणेदार प्रमेश आत्राम, यांच्या उपस्थितीत संपन्न झाली असता बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी वीरेंद्र तराळ, आदर्श शाळेचे आदर्श क्रीडा शिक्षक अनिल पाटील भारसाकळे, प्रबोधन विद्यालयाचे निखिल बुंदीले, तलाठी श्री.डायलकर, सेवानिवृत्त शिक्षक एस.ए.पठाण सर, क्रीडा शिक्षक रत्नाबाई राठी हगवने सर, तलाठी के.व्ही कासरकर, मंडळ अधिकारी बी.एस चव्हाण, जे.ई बांधकाम विभाग पी.एनसावरकर आदी उपस्थित होते.