यामुळे “हे” PVC आधार कार्ड अवैध ; जाणून घ्या कारणे; UAIDA चा निर्णय

नवी दिल्ली : बाजारात बनविलेले आधारचे स्मार्ट कार्ड अवैध असून, हे कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही, असे स्पष्टीकरण आधार कार्ड बनविणाऱ्या ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ (यूआयडीएआय) म्हणजे आधार प्राधिकरणाने दिले आहे.
आधार नोंदणी केल्यानंतर लोक बाजारातून पीव्हीसी आधार कार्ड बनवून घेतात. अशी कार्डे आता चालणार नाहीत, असे आधार प्राधिकरणाने समाजमाध्यमांत जारी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. बाजारात बनविलेल्या आधारच्या स्मार्ट कार्डांत अनेक सुरक्षाविषयक उणिवा असतात. खरे म्हणजे, अशा कार्डांत कोणतेच सुरक्षाविषयक फिचर नसते. त्यामुळे अशा कार्डांना आम्ही अवैध घोषित करीत आहोत, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.

असे मिळवा मूळ कार्ड


प्रधिकरणाने म्हटले की, मूळ आधार कार्ड प्राधिकरणाच्या https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटच्या मदतीने प्राप्त करू शकता.
या साइटवर गेल्यानंतर ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ या पर्यायावर क्लिक करा.
१२ अंकी आधार क्रमांक अथवा २८ अंकी नोंदणी आयटी टाका. सुरक्षा कोड भरा. त्यानंतर तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल. त्यानंतर अटी व शर्ती स्वीकृत करा.
ओटीपी पडताळणीस सबमिट बटन दाबल्यानंतर ‘पेमेंट ऑप्शन’ दिसेल. तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंग याद्वारे पैसे अदा करू शकता. पैसे अदा झाल्यानंतर पावती मिळेल आणि कार्ड पोस्टाने घरपोच येईल.
पीव्हीसी कार्ड महत्त्वाचे…
आपल्याला आधारचे पीव्हीसी कार्ड हवे असेल, तर केवळ ५० रुपये भरून आपण अधिकृतरीत्या ते मिळवू शकता. ते प्राधिकरणाकडून पोस्टाने पाठविले जाईल.


मूळ आधार पीव्हीसी कार्डात डिजिटली साईनड् सुरक्षित क्यूआर कोड असतो. ते छायाचित्रासह येते. त्यात लोकसांख्यिकी तपशील (डेमाॅग्राफिक डिटेल्स) असतो, तसेच सर्व सुरक्षा फिचरही त्यात असतात.

फक्त हे मान्य UIDAI च्या म्हणण्यानुसार, uidai.gov.in वरून डाउनलोड करण्यात आलेले आधार , uidai कडून पोस्टाने आलेले आधार किंवा आधार लेटर किंवा एम-आधार (M-Aadhaar) प्रोफाइल किंवा UIDAIकडून जारी करण्यात आलेले आधार पीव्हीसी कार्ड त्याद्वारेच आधार कार्ड (Aadhaar Card) शी संबंधित कामामध्ये वापर केला जाऊ शकतो तेच वैध आहेत


मूळ कार्डावर असतात हे फिचर्स


प्राधिकरणाने म्हटले की, मूळ पीव्हीसी आधार कार्डात पुढील फिचर्स असतात…
सुरक्षित क्यूआर कोड
होलोग्राम
माइक्रो टेक्स्ट
कार्ड जारी केल्याची व प्रिंट केल्याची तारीख
लोकसांख्यिकी तपशील

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!