ठाणे वार्ता /प्रतिनिधी नीरज शेळके – :
मुंबईत रविवारी म्हणजे दिनांक 23 जानेवारीला घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे कोकणसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या, सहाव्या मार्गाच्या कामासाठी डाऊन जलद मार्गावर रविवारी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यंत १४ तासांचा, तर रविवारी दुपारी १२.३० पासून ते २.३० पर्यंत अप जलद मार्गावर दोन तासांचा मोगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉक कालावधीत दिवा-ठाणेदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर गाड्या धावतील. दादर येथून २२ जानेवारी रोजी रात्री ११.४० पासून ते २३ जानेवारी रोजी पहाटे २.०० पर्यंत सुटणाऱ्या जलद लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या माटुंगा ते कल्याण डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.
या गाड्या ठाणे स्थानकात थांबणार नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २३ जानेवारी रोजी पहाटे २.०० पासून ते ब्लॉक पूर्ण होईपर्यंत कल्याणकडे जाणाऱ्या लोकल, मेल/एक्स्प्रेस गाड्या मुलुंड ते कल्याणदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. कल्याणकडे जाणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नसल्याने या प्रवाशांना दादर, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरून संबंधित गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी दिली आहे.
पनवेलहून सुटणाऱ्या एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस
मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसU
मुंबई – मडगाव मांडवी एक्स्प्रेस
पनवेल येथे थांबणाऱ्या गाड्या