दर्यापूरमधील मुख्य पेट्रोल पंप चौकात रातोरात बसवला शिवरायांचा पुतळा

दर्यापूर – महेश बुंदे

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे प्रत्येक शहरातलं एक धगधगतं ठिकाण असतं. दर्यापूरवासीयांची अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती पूर्ण झाली असून, शहरातील मुख्य पेट्रोल पंप चौकात नियोजित अश्वारूढ पुतळ्याचे आगमन बहुप्रतिक्षेनतंर शनीवारी( दि, १५) रात्रीच्या सुमारास झाले. यावेळी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. कोणतीही परवानगी न घेताच पुतळा बसविनाऱ्या शिवसेनेचे पदाधिकारी यांना दर्यापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. पुतळा हटवू देणार नाही, अशी भूमिका तालुक्यातील शिवप्रेमींनी घेतली आहे.

प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या या पार्श्वभूमीवर मुख्य पेट्रोल पंप चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलिसांच्या वतीने घेतली जात आहे.

कोणाच्या आयुष्यात कधी काय होईल ते सांगता येत नाही. मात्र, काहीही झाले तरी तमाम मराठी माणूस व मावळ्यांच्या मनातील छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेले प्रेम, फक्त अनंत कालापर्यंत कधीच ही कमी होणार नाही. नाव उच्चारताच अंगात बारा हत्तींचे बळ येते अशा छत्रपती शिवरायांचा भक्त असलेल्या पण दुर्दैवाने या जगात नसलेल्या युवकांच्या आठवणी जपण्यासाठी दर्यापुर तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात सहकारी, शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभारून आगळावेगळा शिवप्रेम व्यक्त केला आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!