सोशल मीडियावरील ‘आवाज’ आला मदतीला…!

अमरावती – महेश बुंदे

अमरावती येथून घरातून निघून गेलेली मुलगी सृष्टी प्रशांत गोळे ही रेल्वेतील चल तिकीट परीक्षकांच्या सतर्कतेमुळे आढळून आल्याने चल तिकीट प्रधान तिकीट परीक्षक विनोद खंडारे याचं सर्वत्र कौतुक होत आहे. अमरावती येथील राहणारे तसेच पत्रकार प्रशांत गोळे यांची मुलगी कु. सृष्टी प्रशांत गोळे १४ वर्ष ही सोमवार दिनांक १० जानेवारी सायंकाळी ७ वाजता आपल्या राहत्या मच्छीसाथ एम एस सी बी कार्यालय येथून घरून निघून गेल्याची माहिती तिच्या वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

त्यानंतर ती पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आली होती. त्याचाच परिणाम म्हणून रेल्वे विभागासह पोलीस व इतर ठिकाणी ही सतर्कता बाळगण्यात आली असतानाच दिनांक ११ जानेवारी रोजी गाडी क्रमांक १२१११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस वर S/4 कोच मध्ये आपले कर्तव्य बजावत असताना प्रधान चल तिकीट परीक्षक विनोद खंडारे यांना ६७ नंबरच्या बर्थवर इगतपुरी ते नाशिक दरम्यान कु. सृष्टी प्रशांत गोळे ही मुलगी आढळून आल्याने त्यांनी आपले कर्तव्य बजावत मंडळ वाणिज्य नियंत्रक भुसावळ यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन नाशिक येथील चाईल्ड केअर सेंटरला पाचारण करून कुमारी सृष्टी प्रशांत गोळे हिला आपल्या गाडी मध्ये असलेले मुख्य तिकीट निरीक्षक एस पी कुऱ्हाडे व विभागीय नियंत्रक यांच्या अनुमतीने सुपूर्त केले.

प्रधान तिकीट परीक्षक विनोद खंडारे यांच्या सतर्कते मुळेच सृष्टी प्रशांत गोळे हे आपल्या घरच्यांना परत मिळाली मात्र तेवढीच महत्वाची भूमिका सोशल मिडीयाची होती, घटनेची माहिती लगेच व्हायरल केल्याने त्या मुलीबद्दल लवकरच माहिती मिळाली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!