चाकण मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने अज्ञात व्यक्तीचा मृत्यू ,चाकण पोलीस स्टेशनचे संपर्क साधण्याचे आवाहन

चाकण वार्ता :- चाकण बाजुकडुन शिकापुर बाजुकडे जाणा-या अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवुन रोडने पायी चालत जाणा-या अनोळखी इसमास मेदनकरवाडी गावच्या हद्दीत दिनांक ०९/१०/२०२१ रोजी पहाटे ०५:०० वा चाकण शिक्रापुर रोड इंडिया सुपर मार्केट समोर वाहनाची धडक देउन अनोळखी इसमाचा अपघातात अनोळखी ईसमाचा दोन्ही पायास मार लागुन रक्तस्त्राव होउन त्याचा जागीच मृत्यू झाला असून.अनोळखी इसम वय अंदाजे ५५ वर्षे नाव पत्ता माहित नाही हे रोडने पायी जात असताना मृत्यू झाला.

मयत अनोळखी इसम (ओळख प्रसिद्धीकरिता छायाचित्रे प्रकाशित)


सदर अपघाताची खबर न देता वाहन चालक वाहनासाहित पळून गेला .
या सदर अपघाताची फिर्यादी प्रतिक शहाजी जाधव वय २० वर्षे रावेद हाईटस सोसायटी,ता खेड, जिल्हा-पुणे, यांनी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालका विरूध कायदेशीर फिर्याद दिली आहे.

फिर्यादी वरून चाकण पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा रजिस्टरी चाकण पोलीस स्टेशन गुन्हा रनिं १२३३/२०२१ भादवी ३०४(२) २७९,३३७.३३८ मौ. १८४१३४,२७७ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. तरी सदर घटनेचा तपास पी पी आहेरकर पोहवा/ चाकण पोलीस स्टेशन करीत आहे.

तरी चाकण पोलीस स्टेशन मार्फत जाहीर आव्हान करण्यात येत की सदर मयत इसम किंवा इसमाची ईतर माहिती ,नातेवाईक,परिचय असल्यास नागरिकांनी तात्काळ संपर्क नंबर ९६९९६०८९७६ , ९०७५६२७२९२ चाकण पोलीस स्टेशन लाअज्ञातावरील अज्ञात चालक व अनोळखी मयताचे नातेवाईकांचा शोध होकरीता तात्काळ संपर्क साधावा ही विनंती

वर्णन :- अनोळखी इसम वय अंदाजे ५५ वर्ष पाढरे हाफ बनियान घातलेला असून रंग काळा, केस काळे, मिशी काळी दाढी बारीक सफेद ,दात पूर्ण आहे.(सोबत फोटो सादर)

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!