मानव सेवा दीप एनजीओ व आशिष पाटील गावंडे मित्र परिवाराचे आयोजन
दर्यापूर – महेश बुंदे
स्व. आशिष पाटील गावंडे यांच्या जयंती दिनाचे औचित्त साधत त्यांच्या विचारांना अभिप्रेत असणारा उपक्रम राबवावा या प्रामाणिक हेतूने श्रमिक वर्गाकरीता मदतीची भवना व जिवाभावाची नाते जोपासनारे तसेच वेळोवेळी यांना सेवाभावी वृत्तीने मदतीचा हात आशिष पाटील देत असत. त्यांच्या विचाराला पूजनीय म्हणून त्यांच्या जयंती दिनी मानव सेवा दीप NGO व स्व. आशिष पाटील गावंडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन स्व. त्र्यंबकराव उर्फ बाबासाहेब गावंडे विद्यालय सांगळुद येथे आयोजित केले होता.

या शिबिरामध्ये गावातील २५० नागरिकांनी इ- श्रम कार्ड काढले. सतत तीन दिवस नागरिकांच्या सोयी करीता सुरू होते. या करीता अमरावती जिल्हा सीएससी सेंटर जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ पवार, सेवन स्टार सीएससी सेंटर साईदास प्रांझाळे, राहुल वानखडे, संपूर्ण सेवा सीएससी सेंटर उमेश गावंडे, भूषण गावंडे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.
