पुणे वार्ता :- सिन्नर येथील पीडित तरुणीची आत्महत्या करून गैरकृत्य करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी म्हणून आज खेड तालुक्यातील श्री क्षेत्र आळंदी येथे सर्व समाजाच्या वतीने ॲड. एस. एस. आघाव यांनी कँडल मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर संत भगवान बाबा युवक संघटना, जय भगवान महासंघ, स्वाभिमानी संघर्ष सेना आणि इतर सर्व वतीने आळंदी पोलीस निरीक्षक यांना ऍड. एस. एस. आघाव, माऊली शेठ थोरवे, श्यांमबाला ताई भांगे यांनी निवेदन देऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
या मोर्चात माऊली शेठ थोरवे उपजिल्हा, प्रमुख संत भगवान बाबा युवक संघटना)३) संदीप भाऊ सांगळे स्वाभिमानी संघर्ष सेना अध्यक्ष४) किसन राव पालवे (रिको कंपनी mananger), ५)ह. भ. प.अशोक महाराज आघाव,६) ॲड.सचिन आंधळे, ७)ॲड.दीपक वणवे,८) संभाजी जायभाये, सर्जराव भांगे,राजू दराडे,संजय काकड, राजेश नारायण केदार, विष्णू कुऱ्हाडे, रामा दराडे, महादेव वायभासे, नारायण इंगळे, महादेव चाटे, विठोबा जायभाये,आणि इतर महिला सहभागी झाले… आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या मोर्चात ॲड.एस.एस.आघाव यांनी केली आहे……
काय आहे घटना ………….
किरण राजेंद्र सानप (२५) या सिन्नर संजीवनीनगर भागात राहणाऱ्या युवतीने काही दिवसांपूर्वी (२८ डिसेंबर २०२१) राहत्या घरात ओढणीने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सायंकाळी सातच्या सुमारास आजूबाजूच्या रहिवाशांच्या ही बाब लक्षात आली. स्थानिक नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस आले. त्यांनी तिची लहान बहिण लासलगावडून आल्यानंतर मृतदेह खाली उतरविला व नंतर अंत्यविधी करण्यात आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद ३० डिसेंबरला केली.
