एसटी ‘खड्ड्यात’, खाजगी वाहतुकीचे ‘चांगभले’

दर्यापूर – महेश बुंदे

एस. टी. कर्मचा-यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या २७ ऑक्टोबरपासून राज्यभरात एस. टी. कर्मचा-यांचा संप सुरु आहे.
दिनांक ७ नोव्हेंबर २०२१ पासून दर्यापूर विभागातही कर्मचारी संपावर आहेत. गेली ६१ दिवस हा संप सुरु आहे. या ६१ दिवसांत एस. टी. महामंडळाच्या दर्यापूर विभागाच्या नुकसानीचा आकडा २ कोटी ४४ लाखावर गेला आहे. एस. टी. महामंडळ ‘खड्यात’ जात असताना खाजगी प्रवासी वाहतुकीचे मात्र ‘चांगभले’ होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

एस. टी. चा संप सुरु झाल्यानंतर दोन-तीन दिवसांतच राज्य सरकारने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खाजगी वाहतुकीला प्रवाशी वाहतुकीची परवानगी दिली आणि खाजगी वाहतुकीचा प्रवाशी वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला. एस. टी. च्या दर्यापूर आगारातून ज्या-ज्या मार्गावर एस. टी. जात होती. त्या सर्व मार्गावर खाजगी वाहतुकीच्या गाड्या धावू लागल्या आहेत. हजारो गाड्या प्रवाशी वाहतूक करीत आहेत. संपाच्या ६१ दिवसांत दर्यापूर विभागाचे प्रति दिन ४ लाख रुपयांचे नूकसान झाले. नुकसानीचा एकुण आकडा २ कोटी ४० लाखावर गेला आहे. याचाच अर्थ असा निघतो की, एस. टी. चा २ कोटी ४० लाखांचा तोटा तर खाजगी वाहतुकीचा २ कोटी ४० लाखांचा फायदा. एस. टी. खड्ड्यात चालली तर खाजगी वाहतुकीचे चांगभले होत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!