राजगुरुनगर कडाचीवाडी येथील जेष्ठ कार्यकर्ते जयवंत भिकाजी कड यांची भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी व मारूती कृष्णा कड यांची भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या खेड तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र भारतीय जनता पार्टी खेड तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय घुंडरे पाटील व भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष गुलाब खांडेभराड यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी भाजपा व्यापारी आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष मनोज मांजरे, भाजपा खेड तालुका संघटन सरचिटणीस अॕड.प्रितम शिंदे, भाजपा महिला मोर्चा खेड तालुकाध्यक्षा अॕड.मालिनी शिंदे, भाजपा चाकण शहराध्यक्ष अजय जगनाडे, भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव, भाजपा युवा मोर्चा खेड तालुका उपाध्यक्ष किशोर कुमठेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच यावेळी विठ्ठल महाराज कापसे यांची खेड तालुका सरचिटणीस, सतिश पोपटराव मुंगसे यांची खेड तालुका उपाध्यक्ष व किसन मारूती धंद्रे यांची खेड तालुका चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
पुणे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पुणे जिल्हा परिषद भाजपा गटनेते शरद बुट्टे पाटील, भाजपा खेड तालुकाध्यक्ष शांताराम भोसले व भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष गुलाब खांडेभराड यांच्या नेतृत्वाखाली खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यात्मिक कार्य वाढवून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
