स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदें
पुणे :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने देशात पुन्हा थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक १५ ते १८ वयोगटातील मुलांचे व तरुणांचे लसीकरण मोहिम चालू देशात चालु केली आहे. महाराष्ट्रात देखील या योजनेचा शुभारंभ कऱण्यात आला आहे. राज्यातील शाळेतील विध्यार्थ्यांना कोरोना संसर्ग होऊ लागल्याने आता शाळा बंद कराव्या लागत आहे. खेड तालुक्यातील देखील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम आरोग्य विभागाकडून हाती घेतली आहे.
या मोहिमेत तालुक्यातील मुलांचे लसीकरण तालुक्यातील शाळांमध्ये चालूं झाले आहे..शाळेतील ८ वी ते १२ वीच्या विध्यार्थ्यांना मोफत भारत बायोटेक कंपनीची कोवक्सिन लसीचे भारत सरकारने मान्यता दिलेले कोरोना लसीकरण शासनाकडून करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून हे लसीकरण पार पाडले जाणार आहे. तरी तरुणांनी व विध्यार्थ्यांनी कोरोनाची लस न घाबरता शाळेत जाऊन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज दिनांक ५/१/२०२२ रोजी तालुक्यातील खालील उच्च माध्यमिक, व माध्यमिक शाळेमध्ये लसीकरण होणार आहे.
