अमरावती – महेश बुंदे
भारतीय विद्या मंदिरद्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती, राष्ट्रीय सेवा योजना व संत गाडगे बाबा ब्लड बँक व कंपोनट सेंटर, बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, उद्घाटक ॲड.यदुराज मेटकर,
सरचिटणीस,भारतीय विद्या मंदिर, अमरावती, प्रमुख उपस्थिती डॉ. अनिल कविमंडल रक्त संक्रमण अधिकारी, संत गाडगे बाबा रक्त केंद्र, बडनेरा,मा. राजेश पिदडी, सदस्य, सल्लागार समिती,भारतीय महाविद्यालय, अमरावती, डॉ. प्रशांत विघे, कार्यक्रम अधिकारी, डॉ. स्नेहा जोशी महिला कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. प्रास्तविक डॉ. स्नेहा जोशी यांनी केले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. आराधना वैद्य म्हणाल्या की, रक्तदान हे एक सामजिक बांधिलकी जोपासणारा महत्वाच कार्य आपल्या सर्वच्या हातातून होते आहे. त्यांसाठी आपल्या सर्वांचं अभिनंदन केले. पुढे त्यां मनाल्या की, मी वयाच्या १८ वर्षाच्या असताना पासून रक्तदान करायला सुरुवात केली,आतापर्यंत त्यांनी २५ पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले आहे. मी एक महिला आहे, मला रक्तदान करणे कसे जमेल ,माझ रक्त कमी होईल असे विविध स्वरूपाचे गैरसमज समाजात असल्याचे आपल्या भाषणातून प्रतिपदित केले. कार्यक्रमाचे उद्घाटक ॲड.यदुरज मेटकर यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान असून शिबिराचे उद्घाटन केले. स्वतः रक्तदान करण्याचा संकल्प आपल्या भाषणात केला. या प्रसंगी डॉ.अनिल कवीमंडल म्हणाले की, १८ ते ६० पर्यंत कोणताही व्यक्ती रक्तदान करू शकतो, फक्त त्या व्यक्तीला आजार कोणताही आजार नको हे महत्त्वाचे असे प्रतिपादन केले. राजेश पिदडी यांनी रक्तदान शिबिर आयोजना बदल कौतुक केलं. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आराधना वैद्य दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाविद्यालयाच्या रक्तदान शिबिराला स्वतः रक्तदान करून रक्तदान शिबिरास सुरुवात आज सुद्धा सर्व प्रथम रक्तदान करून सुरुवात केली.
