प्रतिनिधी, विवेक मोरे
आज दिनांक 03/01/2022 ला श्री. राजेंद्र कमलाकर भागवत मौजा माहुली चोर यांच्या शेतात तूर पीक प्रक्षेत्राला कृषी विद्यापीठ अकोला येथील कडधान्य प्रमुख श्री. डॉ.वैद्य व इतर तज्ञ यांनी भेट देऊन पाहणी केली.
सदर प्रक्षेत्र भेटीमध्ये कृषी विद्यापीठ अकोला येथील कडधान्य प्रमुख डॉ.श्री.वैद्य साहेब, व श्री.इंगळे साहेब यांनी तूर व हरभरा पीक रोग व्यवस्थापन बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शेतकरी बांधव यांच्या पीक विषयी शंकाचे निरसन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री.रोशन इंदोरे साहेब , मंडळ कृषी अधिकारी श्री. उदय गावंडे , कृषी सहाय्यक श्री.पंकज लाडके , श्री.राजू बसवणाथे , शेतकरी श्री.राजेंद्र सरोदे , श्री.राजेंद्र भागवत, श्री.मनोज झंझाट , श्री.रवींद्र भागवत , श्री.अमोल सरोदे, श्री. निलेश अग्रवाल, श्री. गोलू दाते व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते. सदर प्रक्षेत्र भेटीचे आभार प्रदर्शन मा.सरपंच राजेंद्र सरोदे यांनी केले.

