स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- शासनाने आयोजित केलेल्या १५ ते १८ वयोगटातील कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण आज खेड तालुक्यातील १३ लसीकरण केंद्रावर शांततेत पार पडले.येत्या काही दिवसांत सर्व शाळेतील विध्यार्थ्यांना व तरुणांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने देशात पुन्हा थैमान घातले आहे.महाराष्ट्रात देखील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउनचे संकेत दिले आहेत. कोरोनाचे रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने आरोग्य प्रशासन कामाला लागले आहेत. कोरोनाचे व ओमीक्रोनचे पुन्हा नविन रुग्ण सापडत असल्याने आरोग्य प्रशासनाकडून खबरदारीला घेतली जात आहे परंतु नागरिक बेफिकीर वागताना दिसत आहेत.
राज्यातील शाळेतील विध्यार्थ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे अजुन मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने आता १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याचे आदेश दिले गेले आहेत. पुण्यातील भारत बायोटेक कंपनीच्या कोवक्षिण या लसीला लहान मुलांवरील तपासणी करून भारत सरकारने परवानगी दिली आहे.त्या पार्श्वभूमीवर आज राज्यात अनेक ठिकाणी लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.
