सध्या थंडीचा कडाका वाढू लागलाय .याचा फटका निसर्ग साखळी लाही बसत आहे .एकमेकांचे भक्ष्य असणारे जीव थंडीमुळे बाहेर पडत नाहीत परंतु त्यांच्यावर अवलंबून असणारे जीव उपाशी मरतात. असच काहीसं महाळूंनगे मध्ये झालं.

महाळूंनगे वाहतूक पोलीस चौकीच्या बाजूला असणाऱ्या उंच विजेच्या टॉवर वर घरटे करून राहणाऱ्या घारीच्या जोडीचे पिल्लू खाली कोसळले तेथील चौकीमध्ये कर्तव्यावर असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिद्र आदलिंग, हेड कॉन्स्टेबल रवींद्र तिटकारे,प्रमोद भोजने ,वाघमारे आदींनी धाव घेऊन त्याला पोलीस चौकीत आणून पाणी पाजले व त्वरित शासनमान्य सर्पमित्र प्राणिरक्षक बापूसाहेब सोनवणे यांना संपर्क केला सोनवणे यांनी जाऊन ते पाहिले असता ते घरीच पिल्लू खूप दिवसांचे उपाशी असल्याचे आढळून आले.

त्यांनी त्वरित त्याला वनविभागाच्या स्वाधीन केले चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन व वनरक्षक योगेश्वर पाटोळे यांच्या देखरेखीखाली त्याला पुढील उपचारासाठी बहीनाबाई चौधरी प्राणी अनाथालयात पाठवण्यात आले
