Post Views: 514
आमदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत, हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते वितरण
दर्यापूर – महेश बुंदे
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचलित आदर्श हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय दर्यापूरच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार हा दर्यापूर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात व क्रीडा क्षेत्राचा एवढेच नाही तर राजकीय क्षेत्रात सुद्धा कार्यरत असलेले युवा नेते क्रीडा शिक्षक अनिल रामकृष्ण पाटील भारसाकळे यांना या वर्षीचा संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत श्री शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन उर्फ भैय्यासाहेब देशमुख यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, बुके देऊन प्रधान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, संचालक केशवराव मेटकर, युवा संचालक हेमंतराव काळमेघ, उपाध्यक्ष डॉ रामचंद्र शेळके, कार्यकारी संचालक ऍड.गजानन पूडकर, प्राचार्य श्री गोपाळराव गौरखेडे आदी उपस्थित होते.