धामणगांव रेल्वे:- लॉयन्स कल्ब धामणगाव एलीट तर्फे स्व. शेवंताबाई नारायणसा गुलवाडे स्मृती प्रित्यर्थ आयोजित व सौ.वनमाला सुभाषराव बुटले तर्फे प्रायोजित हरीना फाऊंडेशन अमरावती यांच्या सौजन्याने नेत्र रोग तपासणी व चष्मे वाटप शिबिराला नागरिकांचा ऊस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात ५३० नागरिकांची नेत्रतपासणी करून 225लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. दत्तापुर भागातील हात मजूरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरजू लोकांना,पैसा अभावी काही वंचित राहत असलेल्या लोकांना अशा मोफत शिबिराची अत्यंत आवश्यकता आहे, असे उद्गार रीजन चेअरपर्सन लायन योगेंद्र कोपुलवार यांनी उद्घाटकन पर भाषणात काढले.
या प्रसंगी हरिना नेत्र दान समितीचे शिबीर प्रमुख शरदभाऊ कासट ,उपाध्यक्ष रामप्रकाशजी गिलडा , शिबिर समिती प्रमुख अजय भाऊ टाके,अमरावती शाखा समिती नरेश सोनी,संपर्क प्रमुख अविनाश राजगुरे,नेत्र तज्ञ डॉ. दिनेश वरंदानी,हरिना नेत्र दान समिती धामणगांव अध्यक्ष अशोक मुंधडा, लॉयन्स कल्ब धामणगाव एलीट चे अध्यक्ष विलास बुटले, सचिव चेतन कोठारी, कोषाध्यक्ष सतिश बुब, लॉ. सुनील जावरकर, लॉ. संजय सायरे , लॉ. जितेंद्र चौधरी, विजय देशमुख ,रिजन चेअरपर्सन योगेंद्र कोपुलवार, नरेंद्र गुल्हाने ,धामणगाव चे नेत्र तज्ञ डॉ.मुकुंद साठे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या महाशिबिरात 90 लोकांनी नेत्रदान राष्ट्रार्पण संकल्प पत्र भरून नेत्रदानाची घोषणा केली तर 11 लोकांनी अवयव दान कार्यक्रमाअंतर्गत डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या मरणोत्तर देहदान ईच्छा पत्रावर स्वेच्छेने स्वाक्षरी करून देहदानाची घोषणा केली. या कार्यक्रमाला मेगा ॲक्टीविटी चेअरपर्सन लायन विलास साखरे यांनी शुभेच्छा देउन सर्वांचे अभिनंदन केले.
या महाशिबिराच्या जाहिरात फलकाचे व माहिती परिपत्रकाचे विमोचन विश्व सेवा सप्ताहाचे लायन्स एम.जे.ॲफ लायन डॉ.रिपल राणे, आर्वी यांच्या हस्ते करण्यात आले होते, त्यांनी ही नेत्रदान, अवयवदान या उपक्रमाची प्रशंसा केली.
गरजवंताला अत्यंत अल्प दरात नेत्रतपासणी करून चष्मा वाटपाचा या शिबिरामुळे परिसरातील शेकडो नागरिकांनी लॉयन्स क्लब चे आभार मानले. धामणगांव येथील नेत्रतज्ज्ञ मुकुंद साठे व अमरावती येथील दिनेश वरदानी यांनी या शिबिराला मोलाचे सहकार्य केले.व कार्यक्रमाचे आभार सूत्रसंचालन सचिव लॉ.चेतन कोठारी यांनी केले.