प्रतिनिधी /ओम मोरे
नांदगाव खंडेश्वर:- तालुक्यातील सावनेर येथे कृषी तंत्र विद्यालय येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य भेंडे सर, सर्व विद्यालयातील शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून तसेच प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य भेंडे सर यांनी आपल्या भाषणातु डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवनातील सामाजिक कार्याचा उजेड मांडला. तसेच भडके सर फुके सरांनी सुद्धा आपल्या शब्दातून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवनातील अनमोल छन विद्यार्थ्यांपुढे व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे विद्यार्थी प्रतीक पुंड यांनी केली, व विद्यालयाचे विद्यार्थी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचे समता करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला संपूर्ण विद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.
