आजपासुन राज्यात नवीन नियमावली जाहीर, काय आहेत नियम पहा

स्वराज्य वार्ता रिपोर्ट

आजपासुन राज्य शासनाने ओमीक्रोनच्या पार्श्वभूमीवर नवीन नियमावली जाहीर केली असुन राज्यात आजपासुन नाईट कर्पू लागु लागु करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.याचे परिपत्रक देखील जाहीर केले असुन नियम मोडण्याऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

देशात ओमीक्रोनचे रुग्ण वाढत असुन त्याला प्रतिबंध करण्यासाठी केंद्राने राज्यांना सूचना केल्या आहेत. बाहेरील देशात कोरोना व ओमीक्रोन पुन्हा थैमान घातले असुन विदेशात लॉकडाउन चालूं केला आहे. त्यामुळे आपल्या देशात देखील खबरदारी म्हणून व राज्यात वाढनारी रुग्णसंख्या पाहता आज राज्य शासनाने निर्बंध लागु केले आहे..

राज्यात नाईट कर्पू रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागु करण्यात आली.

5 जणांना एकाच ठिकाणी उभे राहण्यास बंदी आहे

लग्नसमारंभात व इतर कार्यक्रमात 50% लोकांना परवानगी देण्यात आली आहे.

खुल्या जागी कार्यक्रमात मैदानात 250 लोकांना परवानगी देण्यात आली आहे

बंदिस्त सभागृहात 100 लोकांना परवानगी दिली आहे

हॉटेल,थिएटर,नाट्यगृह यामध्ये 50% उपस्थितीची मर्यादा

एयरपोर्टवरून मुंबई बाहेर जायला बंदी केली आहे

एअरपोर्टवर RTPCR टेस्ट बंधनकारक नाही,मात्र 2 डोस घेतलेले आवश्यक.

क्रीडा स्पर्धांना 50% लोकांची उपस्थिती बंधनकारक केली आहे.

सर्वत्र कोरोनाचे नियम नागरिकांनी पाळण्याचे बंधनकारक केले आहे.

एकुण पाहता राज्यात आतापर्यंत 105 ओमीक्रोनचे रुग्ण सापडले असुन मोठी धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओमीक्रोनच्या पार्श्वभूमीवर आजपासुन नवीन नियमावली राज्यात लागु करण्यात आली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!