
चाकण :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र शासन, पुणे. चाकण नगरपरिषद, चाकण. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान च्या वतीने आज दि.24/12/2021 रोजी सकाळी 8.00 वाजता स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम पार पडला.

सकाळी श्री दामोदर मूर्तीचे पूजन व शिवछत्रपतींच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला मा. श्री. विलासजी वाहाणे ( सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र शासन, पुणे विभाग),ॲड. किरण झिंजुरके ( अध्यक्ष, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान/ पतसंस्था), श्री. राहुल वाडेकर( उपाध्यक्ष, किल्लेदार स्मारक प्रतिष्ठान), श्री. ऋषिकेश बुचुडे( उपाध्यक्ष, किल्लेदार पतसंस्था) श्री. जयेंद्र नवगिरे( संचालक, किल्लेदार पतसंस्था), श्री. संतोष लोणारी( सचिव, किल्लेदार पतसंस्था), श्री. दीपक करपे, डॉ. किशोर घुमटकर, श्री. युवराज कड, श्री. अविनाश देशमुख, श्री. शिवप्रसाद परदेशी, श्री. सतीश चक्कर, श्री. विशाल बालघरे,

तसेच
1.नवसह्याद्री चारिटेबल ट्रस्टचे कै. भागुबाई पिंगळे वाणिज्य रात्र महाविद्यालय,
2.सह्याद्री करियर अकॅडमी,
3.श्री समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल, खराबवाडी,
4.कला व वाणिज्य महाविद्यालय, चाकण,
5.मोशन क्लिप्स इंटरनॅशनल सेंटर फॉर ॲनिमेशन,
संस्था, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व चाकण पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
