महात्मा फुले बहुउद्देशिय संस्था : विवाहबंधन पुस्तिका प्रकाशन सोहळा
राजेंद्र वाटाणे/अमरावती
महात्मा फुले बहुउद्देशिय संस्था अमरावती द्वारा ६ व्या बहुराज्यस्तरीय माळी समाज उपवर युवक -युवती परिचय महामेळावा तथा विवाह बंधन प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी स्व. नामदेवरावजी लोखंडे(गजानन नगरी),गोल्डन लिप मंगल कार्यालयासमोर,रहाटगाव रिंग रोड अमरावती येथे सकाळी ११ ते ४ दरम्यान आयोजित केलेला आहे.
महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष प्रभाकरराव घाटोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महामेळावाचे उद्घाटन दिलीपराव लोखंडे (उपाध्यक्ष,महात्मा फुले बँक अमरावती) हे करणार असून स्वागताध्यक्षपद प्रदीप खवले हे भूषविणार आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता या उद्देशाने निर्माण झालेल्या महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था ही सामाजिक कार्यात कार्यरत असून गत पाच वर्षापासून या परिचय मेळाव्याचे आयोजन करत आहे.
यावर्षी विवाहबंधन या परिचय पुस्तिकेमध्ये एकूण दीड हजार पेक्षा जास्त उपवर युवक युवती चा परिचयाचा समावेश आहे.विवाहबंधनच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक युवक-युवती विवाह बंधनात गुंफले गेले आहेत.
या परिचय मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजय खेरडे (प्राचार्य,सिपना इंजीनिअरींग कॉलेज,अमरावती), जि.प सदस्या पुजा हाडोळे,वंदना करुले,महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष राजेंद्र आंडे, वामन वासनकर,प्रमोद कोरडे, राजेश सावरकर (माजी उपाध्यक्ष,जि.प.शिक्षक बँक अमरावती), उद्योजक प्रविन ढवळे,निळकंठ यावलकर,अरुण खेरडे,सागर बनकर, डॉ.सुधाकर बंदे, डॉ.मिनाताई बंदे (संचालक,बंदे हॉस्पीटल वरुड),अतुल देवघरे (संचालक,सरदार अँग्रीकेम,अमरावती),पुरुषोत्तम कळमकर(सचिव नवयुवक शिक्षण संस्था वरुड),दिलीप लोखंडे(संचालक तेलाई सेलिब्रेशन),आशिष क्षीरसागर(संचालक,ओम सेल्स एंड प्लायवूड)प्रा.रामरावजी वानखडे (अध्यक्ष,उत्क्रांती नागरी पतसंस्था),अनिरुद्ध बेलसरे (संचालक राधा टाइल्स),उध्ववराव व्हि.फुटाणे(संचालक कुशल इंशुरन्स सव्हिर्स,वरुड), उमेश उमप(संचालक,ईश्वर ट्रॅवल्स)हर्षद जावरकर(संचालक,जावरकर लॉंन्स)चंद्रकांत सुकलकर( संचालक,गुरुदेव प्रिंटर्स),डॉ पंकज लांडे(श्री नेत्रालय),डॉ.पल्लवी कांडलकर(संचालिका,श्री स्क्रीन एंड हेअर क्लिनिक),डॉ.विनायक उमप(संचालक आशीर्वाद मंगल कार्यालय,मोझरी),प्रशांत लांडे आदींची उपस्थिती राहणार आहे.
समाज बांधवांनी कोविड नियमांचे पालन करून महामेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक तथा संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर शा. घाटोळ ,कार्याध्यक्ष दिपक लोखंडे,प्रकाश लोखंडे,उपाध्यक्ष केशव झाडे,दिवाकर फरकाडे,संजय गणोरकर,सचिव प्रवीण पेटकर,कोषाध्यक्ष प्रा.रुपेश फसाटे,सहसचिव अनिल वर्हेकर,डॉ.अनिल कळमकर,सदस्य बाबाराव ठाकरे,पंजाब फरकाडे,विनोद बकाले,संतोष मालधुरे,प्रा.देविदास उमप,नीलिमा लोखंडे,विजयश्री गणोरकर यांचे कार्यकारिणीतील सर्व तालुका कार्यकारिणी सदस्य आणी संपादक मंडळ यांनी केली आहे.
विद्यार्थांसाठी वसतीगृहसह डिजिटल लायब्ररी