विषय शिक्षकांच्या आदेशामधिल अन्यायकारक अट रद्द करा

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या बाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना शिक्षक समितीचे निवेदन

राजेंद्र वाटाणे/ अमरावती

अमरावती दि.२१डिसेंबर-
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा कार्यकारीनी शिष्ट्रमंडळाने अमरावती जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी ई.झेड्.खान यांना शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या बाबत सोमवार दि.२०डिसेंबरला शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत,जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर केले.


या निवेदनात ८डिसेंबरला विषय शिक्षकांच्या आदिवासी क्षेञातील शिक्षकांनी पदस्थापना स्विकारल्या आहे.पण जिल्हा परिषदने पर्यायी व्यवस्था झाल्या शिवाय या शिक्षकांना कार्यमुक्त करू नये अशी अट आदेशात नमुद केली आहे.हे पुनतः चुकीचे व अन्यायकारक आहे.उशिरा कार्यमुक्त झाल्यामुळे पुढिल सेवेची पदोन्नतीत सेवाजेष्ठता डावलल्या जाते.तसेच त्यांचे आर्थीक नुकसान होते.करीता मेळघाट मधिल या विषय शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करुन आदेशाच्या दिवसा पासुन सेवाजेष्ठता पकडण्यात यावी अशी मागणी शिक्षक समितीने केली.

अमरावती जिल्हातील केंद्रप्रमुखांची रीक्तपदे नियमित पदोन्नतीने तसेच तदर्थ पदोन्नतीव्दारे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात यावी.जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदविधर शिक्षक प्राथमिक या पदावर तिन वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण केली असेल अश्या पाञ शिक्षकांना तदर्थ पदोन्नतीने तात्पुरत्या स्वरुपाची नेमणुक देण्यात यावी.अमरावती जि.प.मध्ये केन्द्रप्रमुखांची १११पदे रीक्त आहे.हि पदे भरण्याची मागणी शिक्षक समितीने केली आहे.चटोपाध्याय वेतनश्रेणी मंजुर झालेल्या प्राथमिक शिक्षकांना १२वर्ष पूर्ण झालेल्या तारखे पासुनची थकबाकी त्वरीत मिळण्यात यावी तसेच डीसीपीएस धारक शिक्षकांना शासनाच्या आदेशानुसार ७व्या वेतन आयोगाचा थकबाकीचा दुसरा हप्ता नगदी स्वरूपात मिळण्यात यावा,इतर शिक्षकांचा दुसरा हप्ता जिपीएफ मध्ये जमा करण्यात यावा.


सन २०१९-२०व २०२०-२१मधिल जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा तात्काळ घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.मागील वर्षीतील १५शिक्षक व या वर्षातील १५शिक्षक यांना आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.निवड झालेल्या शिक्षकांना पुरस्कार त्वरीत देण्यात यावा.३जानेवारीला घेण्याची मागणी शिक्षक समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी,प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.निवेदन देतेवेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत,जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे,महीला आघाडी प्रमुख सरीता काठोळे,सरचिटणीस योगिता जिरापूरे,तालुकाध्यक्ष अजय पवार,छगन चौधरी,सचिन राऊत,शैलेन्द्र दहातोंडे,लता टेंभरे,लता उदापूरे,विजया गाडगे,अलका राऊत सह इतर पदाधिकारी उपस्थित होते,असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!