फिलिपाईन्समध्ये ‘टायफून राय’ नावाच्या (Philippines Typhoon) वादळामुळे २०८ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. नॅशनल पोलिसांनी सोमवारी सांगितले की, “यावर्षी फिलिपिन्समध्ये आलेल्या वादळामुळे मृतांची संख्या ही २०८ वर गेली आहे.टायफून राय नावाच्या वादळाने द्विपसमूहाच्या दक्षिण आणि मध्य भागात जास्त नुकसान झालेले आहे. त्यात २३९ लोकं जखमी झालेले आहेत. तर ५२ लोक बेपत्ता झालेले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार टायफून राय या वादळाने घर आणि रुग्णालयांवरील छतांचे नुकसान झालेले आहे. तसेच अनेक झाडे उन्मळून पडलेली आहे. विजेचे खांब कोसळलेले आहेत. लाकडांच्या घरांना तर उद्ध्वस्त केलेले आहे. काही गावांमध्ये पूर आलेले होते. प्रांत गव्हर्नर आर्थर याप यांनी आपल्या फेसबुक पेजवर बोहोल बेटाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली. चाॅकलेट हिल्स या भागात ७४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ताशी १९५ किलोमीटर या वेगाने हे वादळ पुढे सरकत आहे. त्यातून अतिवेगाने वारे वाहत असल्यामुळे सिरगाओ, दीनागट आणि मिंडानाओ बेटांवरही भीषण नुकसान झालेले आहे. २०१३ मध्ये सुपर टायफून हैयानच्या तुलना टायफून रायशी केली जात आहे. टायफून हैयान या वादळामुळे तब्बल ७३०० लोक मृत्यूमुखी पडलेले होते. सध्या काही भागांमध्ये संचारबंदी लागू केलेली आहे, तर काही भागात विज ठप्प झालेली आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.दळणवळण, वीज पुरवठा ठप्प झाला आहे. मदत आणि बचाव कार्य अजून सुरू आहे. हजारो सैन्य, पोलीस, तटरक्षक दल आणि अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहेत.

स्थानिक राज्यपाल आर्थर याप यांनी आपल्या फेसबूक पेजवरून सांगितले की, राय चक्रीवादळाचा समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बोहोळ बेटाला मोठा फटका बसला आहे. चॉकलेट हिल्सच्या भागात ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. १९५ किलोमीटर प्रती तास वेगाने सुरू असलेल्या हवेमुळे सिरगाओ, दिनागट आणि मिंडानाओ बेटांवर विध्वंस झाला आहे.
