बातमी संकलन – महेश बुंदे
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित भारतीय विद्या मंदिर अमरावती द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारा गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मतदार नोंदणी व मतदान जागृती विषय पथनाट्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी सर्वप्रथम गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रशांत विघे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी या पथनाट्यमध्ये विविध मतदान जनजागृती पर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करून , १ जानेवारी २०२२ ला १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी मतदान यादीमध्ये नाव नोंदणी पाहिजे असा संदेश दिला. या प्रसंगी बोलताना प्राचार्या डॉ. आराधना वैद्य म्हणाल्या की, मतदान यादीमध्ये आपलं नाव नोंदणी करणे,आपलं कर्तव्य आहे. देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपले नाव मतदान यादीत नोंदणी पाहिजे. सुजाण नागरिकांचे देशाचे भवितव्य घडू शकतो असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
