राजेंद्र वाटाणे/ अमरावती
लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे महाराष्ट्रातील पत्रकार, त्यांचे कुटुंब व सामान्य जनतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन सप्तफेरे वधू वर सूचक केंद्र या संस्थेने हा पुरस्कार जाहीर केला आहे. सदर संस्थेचे संस्थापक व कालपरिवर्तन या वृत्तपत्राचे संपादक श्री संजय राजुळे व त्यांच्या टीमने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांची भेट घेऊन निमंत्रण पत्र दिले आहे.
