चौथ्या टप्प्याचा निधी तत्काळ देण्याची मागणी
चांदूर रेल्वे – धीरज पंवार/ सुभाष कोटेचा
चांदूर रेल्वे शहरातील ज्या लाभार्थ्यांची नझुल मध्ये जागा आहे त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा या प्रमुख मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीतर्फे माजी न. प. उपाध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वात चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आहे. तसेच चौथ्या टप्प्याचा निधी ही तत्काळ देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
चांदूर रेल्वे शहरात घरांची आवश्यकता असणाऱ्या अनेक गोरगरिबांची जागा नझुलमध्ये आहे. त्यांची स्वत:ची जागा नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत घरकुलाचा लाभ पोहोचत नाही आहे. या लाभार्थ्यांना घरकुलाची अति आवश्यकता असतांना त्यांना घरकुल योजनेतुन डावलण्यात येत आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल देण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. याशिवाय घरकुल लाभार्थ्यांना चौथा टप्प्याचा निधी तत्काळ देण्यात यावा, घरकुलच्या दुसऱ्या यादीचा पहिला टप्पा लवकर द्यावा, घरकुलची तिसरी यादी लवकरात लवकर पूर्ण करावी आदी मागण्या सुद्धा करण्यात आल्या आहे. निवेदन देतेवेळी आम आदमी पार्टीचे विदर्भ संघटनमंत्री तथा माजी न. प. उपाध्यक्ष नितीन गवळी, मेहमुद हुसैन, चरण जोल्हे, पंकज गुडधे, निलेश होले, शे. हसनभाई, श्याम चव्हाण, पुष्पा गोखे, साधना भेंडे, गणेश क्षिरसागर यांसह अनेकांची उपस्थिती होती

प्रत्येक वेळी आंदोलनच करावे का ? – नितीन गवळी