प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:- जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या आदेशाने निवासी जिल्हाधिकारी शैलेश हींगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.10 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 4:30 वाजता आग प्रतिबंधक व्यवस्थापन आणी आग नियंत्रण व्यवस्थापन व पुर्व सज्जता आणी बचाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन देऊन आग विझविण्यासाठी करावयाची कार्यवाही कार्यक्रम वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.या कार्यक्रमाला कार्यालयातील सर्व अधिकारी आणी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
