आतापर्यंत 12 लाख 32 हजार व्यक्तींचे लसीकरण 77.39 टक्के व्यक्तींनी घेतला पहिला तर 48.13 टक्के व्यक्तींना दुसरा डोस

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम: कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस घेणे हा एकमेव उपाय आहे. जिल्हयात सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याची मोहिम वेगाने राबविण्यात येत आहे. जिल्हयात 9 डिसेंबरपर्यंत 12 लाख 32 हजार 979 व्यक्तींनी लस घेतली आहे. यामध्ये पहिला डोस 7 लाख 60 हजार 173 व्यक्तींना आणि दुसरा डोस 4 लाख 72 हजार 806 व्यक्तींना देण्यात आला आहे. पहिला डोसचे प्रमाण 77.39 टक्के आणि दुसरा डोसचे प्रमाण 48.13 टक्के आहे.

जिल्हयात कोविड लसीकरणासाठी 9 लाख 82 हजार 300 व्यक्ती पात्र ठरले. आतापर्यंत 12 लाख 32 हजार 979 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये दोन्ही डोसचा समावेश आहे. रिसोड तालुक्यात पहिला डोस 1 लाख 38 हजार 426 व्यक्तींनी घेतला आणि दुसरा डोस 90 हजार 404 व्यक्तींनी घेतला. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 83.16 टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 54.31 टक्के आहे. कारंजा तालुक्यातील पहिला डोस 1 लाख 45 हजार 733 व्यक्तींनी आणि दुसरा डोस 91 हजार 261 व्यक्तींना देण्यात आला. पहिला डोसचे प्रमाण 84.95 टक्के आणि दुसऱ्या डोसचे प्रमाण 53.19 टक्के आहे.

वाशिम तालुक्यातील 1 लाख 72 हजार 671 व्यक्तींना पहिला डोस आणि 1 लाख 15 हजार 9235 व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला. पहिला डोसचे प्रमाण 84.44 टक्के आणि दुसरा डोसचे प्रमाण 56.69 टक्के आहे. मंगरुळपीर तालुक्यात 1 लाख 14 हजार 544 व्यक्तींनी पहिला डोस आणि 69 हजार 472 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 81.46 टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 49.41 टक्के आहे.

मानोरा तालुक्यातील 83 हजार 710 व्यक्तींना पहिला डोस आणि 44 हजार 866 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 63.51 टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 34.04 टक्के आहे. मालेगांव तालुक्यातील 1 लाख 5 हजार 89 व्यक्तींनी पहिला डोस आणि दुसरा डोस 60 हजार 880 व्यक्तींनी घेतला पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 62.79 टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 36.38 टक्के आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!