पोलिस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी हद्दीतील अवैध दारू विक्रेता वहिद खान सैफुल्ला खान पठाण, वय 52वर्षे, रा. ब्राह्मणवाडा थडी, यास कलम 56(ब) महाराष्ट्र पोलिस कायदा प्रमाणे तडीपार करण्यात यावे.
या बाबत पोलिस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी मा. उपविभागीय दंडाधिकारी सा, अचलपूर यांच्याकडे अहवाल सादर केला होता. पोलिसांचा सदर अहवाल SDM सा. अचलपूर यांनी मान्य करून जाब देणार यास 6 महिन्यासाठी तडीपार केले आहे, त्यास जिल्ह्याबाहेर नातेवाईकांकडे सोपविण्याची कारवाई ब्राह्मणवाडा पोलिस स्टेशन पोलिसांकडून सुरु आहे.