Post Views: 452
वार्तापत्र – महेश बुंदे (दर्यापूर तालुका प्रतिननिधी)
कोरोना संपला नाही असे नाही नवीन व्हेरिअंट आला म्हणून तो आपल्या दारावर दस्तक देतो आहे परंतु काही केल्या एस. टी महामंडळाचा संप मिटता मिटेना, हे सर्व अनुभवत असताना एकीकडे शासनाने शाळा सुरू केलेल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत जाण्यासाठी सर्वांची लगबग सुरू झालेली आहे. परंतु जे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये आहेत, या विद्यार्थ्यांसमोर येण्या-जाण्याचा अतिशय गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे. बहुसंख्य विद्यार्थी हे ग्रामीण भागातून दर्यापूरसारख्या शहरी वजा तालुक्याच्या ठिकाणी येतात आणि असंख्य विद्यार्थी बसच्या माध्यमातून पास काढून आपली शिक्षणाची भूक भागवतात. आज ह्या विद्यार्थ्यांना बस अभावी शाळेमध्ये येता येत नाही. आधीच आपल कोरोनान महाभयंकर नुकसान केलेलं आहे.
तेव्हा ग्रामीण भागातला विद्यार्थी हा आधीच अडचणीचं असतो आणि या अडचणीत भरीच भर म्हणून एसटी बंद असल्यामुळे या विद्यार्थ्यांना आता शाळा महाविद्यालयात येण्यासाठी पर्यायाने खाजगी वाहनाने किंवा एखाद्याकडे जर मोटार सायकल असेल तर मोटार सायकलच्या माध्यमातून त्यांना यावे लागत खर तर ग्रामीण भागात राहणारी ही सर्व जनता होतकरू गरीब मजुरी करणारीच असते आणि रोजच्या रोज त्यांना खाजगी वाहनाचा प्रवास, महागलेल पेट्रोल डिझेल विकत घेऊन प्रवास करणे या सर्व विद्यार्थ्यांना आता शक्य नाही, म्हणून हा विद्यार्थी मेटाकुटीस आलेला आहे. शासनाने एसटी त्वरित सुरू करावी, त्यावर योग्य तोडगा काढावा जेणेकरून आधीच कोरोनाने थांबलेलं विद्यार्थ्यांच शिक्षण पूर्वरत आपल्याला करता येईल आणि आजची पिढी ही भविष्याची, भारत देशाची पिढी असते देश घडविणारी पिढी असते ही पिढी जर मागे राहिला तर देश मागे राहिल्यावाचून राहणार नाही.