Post Views: 440
राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजन
दर्यापूर – महेश बुंदे
स्थानिक दर्यापूर येथील श्रीमती कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त उपक्रमाने मतदान जनजागृती कार्यक्रम संस्थेच्या अध्यक्षा कांचनमाला गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्य डॉ. अविनाश चौखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. मतदान जनजागृती या विषयावर प्रमुख व्याख्याता म्हणून डॉ. प्रकाश पानतावणे यांनी मतदानाचा अधिकार मतदार नोंदणी आणि मतदाराने जात-पात धर्म इत्यादी कोणत्याही बाबींचा आधार न घेता आपल्या विवेक बुद्धीला स्मरून योग्य त्या उमेदवाराला निवडून देऊन लोकशाही सक्षम करावी असा विद्यार्थिनींना मोलाचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कांचनमाला गावंडे यांनी सुद्धा आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या विधानाबाबत तसेच त्यातील प्रत्येक कलमाबाबत आपण सर्वांनी अवगत असणे महत्त्वाचे आहे न व मतदारांनी काळजीपूर्वक मतदान करून आपला विवेक जागृत ठेवून उत्साहाने आपण मतदार नोंदणी करावी तसेच मतदान करताना कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण मतदान केले पाहिजे ती आपली जबाबदारी आहे असा सल्ला त्यांनी विद्यार्थिनींना दिला. प्राचार्य डॉक्टर चौखंडे यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी ज्यांच्या वयाला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांनी मतदार नोंदणी करावी तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे वेळोवेळी पालन आपण नागरिक या नात्याने केले पाहिजे असा संदेश त्यांनी आपल्या भाषणांमधून दिला. सदर कार्यक्रमाचे संचलन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. हरिदास आखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. गजानन हेरोळे यांनी केले.