कळंबा महाली ते कुंभी रस्त्याचे काम थातूर-मातूर डागडुजी होऊ देणार नाही- संभाजी ब्रिगेड

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम: कळंबा महाली ते कुंभी हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग, हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून थातूर-मातूर डागडुजी करण्यात येणार असल्याचे कळताच हा मार्ग थातूर-मातूर डागडुजी होऊ देणार नाही आणि रस्त्याची पुनर्निर्मिती करण्यात यावी
अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले आहे.


कळंबा महाल्ली ते कुंभी हा रस्ता बऱ्याच वर्षापासून मोडकळीस आलेला असून या प्रमुख जिल्हा मार्गावर खरोळा, काजळंबा, देपुळ,वारा,लही आणि कुंभी हे गावं आहेत . या मार्गावरील नादुरुस्त रस्त्यामुळे गावातील जनता त्रस्त झालेली आहे. संबंधित रस्ता हा दुरुस्ती च्या नावाखाली थातुर मातुर डागडुजी चे काम करून शासनाच्या निधीचा अपहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे आमच्या निदर्शनास आले असता, हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत दुरुस्त होऊ शकत नाही, म्हणून संबंधित रस्त्याची पुनर्निर्मिती करण्यात यावी, म्हणजेच हा रस्ता नव्याने पूर्ण करावा अन्यथा रस्त्याची होणारी डागडुजी कदापि होऊ दिली जाणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने या निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांना देण्यात आला आहे.

संबंधित विभागाच्या वतीने जर हा रस्ता नव्यानं न करता, डागडुजी करण्याचा प्रयत्न करणार असतील तर ह्या मार्गावरील गावातील जनता आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिस्थितीस शासन व प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.
संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांच्या मार्गदर्शनानुसार निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत गावंडे, विधानसभा अध्यक्ष राहुल बलखंडे, उपाध्यक्ष पवन मालस, नितेश पोहकर, दत्ता ठाकरे, राजरत्न पठाडे, गजानन धवसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!