कारंजा येथून जवळ असलेल्या पॉवर हाऊस समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक गंभीर जखमी

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-कारंजा दिनांक 6 डिसेंबर शहरापासून ६ किमी अंतरावर असलेल्या दारव्हा रोडवरील पॉवर हाऊससमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली, ही धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला व एकजण गंभीर जख्मी झाला.


मिळालेल्या माहितीनुसार घरातील स्टाईल फरशी बसवण्याचे काम करणारे दोन युवक कारंजा येथे दिवसभराचे काम आटोपून दुचाकी क्र. एमएच 29-पी-7498 ने 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता आपल्या गावी कामठवाडा येथे जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली, यात लखन गणेश चव्हाण (19) व रामेश्वर अर्जुन राठोड (20) हे गंभीर जख्मी झाले. भाग्येश बाकल यांनी अनुप ठाकरे याच्याशी भ्रमणध्वनी व्दारे संवाद साधुन रुग्णवाहीका घटनास्थळी बोलाविण्यात आली नवनिर्माण रुग्णवाहिका सेवा वं रुग्णवाहिकेचा चालक विनोद खोंड यांनी कामठवाडा येथील नागरिकांच्या मदतीने जख्मी व गंभीर जख्मी युवकाला उचलून कारंजा उपजिल्हा रुग्णालयात नेले, प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी तरुण रामेश्वर राठोड या युवकाला पुढील उपचारासाठी अमरावती ये पाठविण्यात आले. अज्ञात वाहनचालक घटना स्थळावरुन पळून गेला.

हा प्रकार लक्षात येताच कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अधारसींग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी साथीदारांसह घटनास्थळी पोहोचून अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला. पुढील तपास कारंजा शहर पोलीस करत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!