प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:- विधानपरिषदेच्या अकोला – वाशिम- बुलढाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज 5 डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील चारही मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. मतदानाच्या दृष्टीने केलेल्या तयारीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. रिसोड येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला भेट देऊन डॉ. पांढरपट्टे यांनी तहसीलदार अजित शेलार यांच्याकडून मतदान केंद्रावर मतदानाच्या दृष्टीने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.
