दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर येथील शासकीय वसतीगृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिक्षक श्री. अनिल खेडकर होते. यावेळी माजी विद्यार्थी महेश बुंदे, दिलीप राठोड, शुभम गवळी, विकास भोंगाडे, तुषार पचगाडे, शेखर शिरभाते, धर्मेंद्र आठवले, उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश बुंदे यांनी केले तर आभार विकास भोंगाडे यांनी मानले .
प्रतिक्रिया –
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा गांभीर्याने पालन करण्याचा व दुःखाचा दिवस आहे. या दिवशी बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांसह कर्मचारी जमले होते.”
अनिल खेडकर ( अधीक्षक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह दर्यापूर )