पुणे :- राज्यात परदेशातुन आलेल्या नागरिकांमध्ये ओमीक्रोन या नव्या अवताराचा धोका वाढत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.मुंबईतील डोंबिवली नंतर आता पुणे,पिंपरी चिंचवड मध्ये ओमीक्रोनचे ७ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आळंदीमध्ये देखील एक संशयित रुग्ण सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती.त्यामुळे आळंदी मधील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु या संशयित रुग्णाचा अहवाल येणे बाकी असुन अजुन खेड तालुक्यातील ग्रामीण भागात, गावात व आळंदीमध्ये एकही रुग्ण न सापडल्याचे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.असे आवाह मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
आयुष प्रसाद मुख्याधिकारी
राज्यात परदेशातुन आलेले अनेक नागरिकांची यादी व त्याची तपासणी आरोग्य विभागाकडुन करण्यात येत असल्याचे देखील सांगितले.तसेच अजूनही खेड तालुक्यातील अनेक नागरिकांनी लसीचे डोस घेतले नसल्याने मोठा धोका निर्माण होण्याची चिन्हे आहेत.त्यातच शहरातील बाजारपेठेत,मार्केटयार्ड, सार्वजनिक प्रवासी वाहतूक, कार्यक्रमांना होणारी गर्दी यांमधून सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ही गर्दी नक्कीच ओमीक्रोनला आमंत्रण देणारी ठरत आहे. त्यावर आरोग्य प्रशासन काय ठोस पाऊले उचलणार हेच पाहावे लागेल.