वाशिम जिल्ह्यात आज 7 हजार 934 व्यक्तींचे लसीकरण

फुलचंद भगत


वाशिम:-जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.ओमीक्रोन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला असताना नागरिक आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरसावले आहे.

जिल्ह्यात आज 4 डिसेंबर रोजी 7 हजार 934 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 4019 व्यक्तींनी व दुसरा डोस 3915 व्यक्तींनी घेतला.
वाशिम तालुका : पहिला डोस – 984 व दुसरा डोस -1079 असा एकूण 2063, मालेगाव तालुका : पहिला डोस – 723 आणि दुसरा डोस – 708 एकूण 1431, रिसोड तालुका : पहिला डोस – 533 व दुसरा डोस – 480 एकूण 1013, कारंजा तालुका : पहिला डोस – 802 आणि दुसरा डोस 731 एकूण 1533, मानोरा तालुका : पहिला डोस – 472 व दुसरा डोस 378 एकूण 850 आणि मंगरूळपीर तालुका : पहिला डोस – 505 आणि दुसरा डोस – 539 असा एकूण 1044 व्यक्तींना देण्यात आला.


जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 66.79 टक्के व्यक्तींना पहिला डोस, आणि 41.33 टक्के व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. शहरी भागातील 111. 98 टक्के व्यक्तींनी पहिला डोस आणि 65.22 टक्के व्यक्तीने दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण 75.52 टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तींची प्रमाण 45.95 टक्के आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!