सेवाभावी वृत्ती जोपासणार्या आणी दिनदुबळ्यांची सेवा मानणार्या पर्यावरणप्रेमी मिनाक्षी वैद्द(भाकरे)
प्रतिनिधी फुलचंद भगत :-
वाशिम:-आपले कर्तव्य बजावुन दिनदुबळ्या पिडित,दुःखी व गोरगरीबांसाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्या तसेच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे,वनचरे’ या ऊक्तीप्रमाणे पर्यावरण संवर्धन भुमिका जोपासुन कार्य करणार्या खाकीतील देवदुत असणार्या वाशिम ऊपविभागिय कार्यालयातील मिनाक्षी वैद्द(भाकरे) यांनी जिद्दीने आणी परिश्रमाने आलेल्या संकटावर मात करत आपले सेवाव्रत कायम ठेवून एक प्रेरणादायी ऊदाहरण सर्वांपुढे ठेवले आहे.
वाशिम पोलिसदलात कार्यरत असणार्या मिनाक्षी वैद्द (भाकरे)यांना बालपणापासुनच लोकसेवेची आवड आहे.सोबतच माणवाच्या जिवनामध्ये पर्यावरणाचे महत्व ओळखुन पर्यावरण संवर्धनाची कासही त्यांनी जोपासली आहे.कोरोणाकाळात सर्वञ हाहाकार होता.सर्व लाॅकडाऊन होते.कित्येकांचे हातचे काम गेले,खायचे वांदे झाले.या सर्व परिस्थितिची जाणीव ठेवून पोलिस दलात असणार्या मिनाक्षी वैद्द(भाकरे) यांनी ग्रामिण रूग्नालयात जावुन कोरोणा पेशंटच्या नातेवाइकांना खिचडी वाटप केली.पुलाखाली राहणार्या व भटकंती करत भिक्षा मागुन जिवन जगणार्या गरजु गरीबांना ब्लॅकेट देवून मायेची ऊब दिली.मुलाचा वाढदिवस साजरा न करता व अवास्तव खर्च न करता पालामध्ये वास्तव्य करणार्या कुटुंबियांना गृहपयोगी साहित्य,किराणाचे वितरण करुन आधार देण्याचे काम त्यांनी केले.मंदिराबाहेर राहुन गुजरान करर्या गरजु लोकांसाठी झुनका भाकर खाऊ घातली.ज्यांना जेवणाची सोय नाही अशा रेल्वे स्टेशन,पोलिस स्टेशन,बस स्टॅन्ड परिसरात वावरणार्या गरीबांना जेवणाची सोय केली.अशा सेवाभावी वृत्ती जोपासणार्या मिनाक्षी यांचा दुर्देवाने कर्तव्यावर असतांनाच अपघात झाला.कारने त्यांना ऊडवल्याने यात त्यांचे दोन मणके,कमरेवर आणी हातावर शस्ञक्रीया करण्यात आली.दोन मणके तुटने,हाताची पाचही बोटे तिरपी होणे,खाली बसता न येणे या सर्व गोष्टीतुन जिद्दीने व मोठ्या हिम्मतीने मात करुन तब्बल एका वर्षानंतर या अपघातातुन बरे होणे एक चॅलेंजच वैद्द (भाकरे)यांनी पुर्ण केले.डाॅक्टरांनी वाहन चालवण्यास मनाई केली तरीही आपल्या शारिरीकतेवर मात करुन जिद्दीने गाडी चालवली नंतर आपल्या पोलिस दलातील कर्तव्यावर पुन्हा नव्या ऊमेदीने रुजु झाल्या.त्यानंतर ८ मार्च रोजी महिलादिनी कामाची पारख करुन आयपिएस डाॅ.पवन बन्सोड यांनी दखल घेतली व वाशिम ऊपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालयात आवक जावक चार्ज दिला.तिथे असतांना डाॅ.बन्सोड यांनी पोलिसांसाठी कार्यालय परिसरात बगीचा तयार केला पण कालांतराने त्यांचीही बदली झाली.त्या बागेतील झाडे सुकली,निष्पर्ण झाली.हे चिञ पाहिल्यानंतर पर्यावरण संवर्धनासाठी आपणही पाऊले ऊचलणे गरजेचे असल्याचे लक्षात आले आणी भर ऊन्हाळ्यात या बगिचाला फुलवण्याचा प्रण मनाशी करुन त्यांनी त्या वृक्षांना पाणी टाकुन ती बाग फुलवली.आज तो फुलमळा मिनाक्षी वैद्द(भाकरे) यांच्या जिद्द आणी वृक्षप्रेमाची साक्ष देत फुललेला दृष्टीपथात येतो.पोलिस दलातील ही सेवावृत्ती दुर्मीळच असल्याने खाकीतील देवदुताची ही ओळख सर्वांना नसेलही.पण लोकहितासाठी कर्तव्यापलिकडेही कर्तव्य बजावणार्या रा रणरागीणीच्या कार्याची वाशिम पोलिस दलातील वरिष्ठांनी दखल घेवुन त्यांचा गौरव व्हावा अशी मागणी सामाजीक संघटना आणी पर्यावरणप्रेमींमधुन होत आहे.