आजी मी तुमच्या नातीसारखी आहे आणी नातीचा हट्ट मोडु नये,आता घ्या लस! अधिकारी की जादुगीरी;प्रशासकीय कामगीरीची अनोखी पध्दत कोरोना प्रतिबंधक मोहिमेतील ‘द ग्रेट शिलेदार’ सिडिपिओ प्रियंका गवळी लोकांमध्ये मिसळुन,आपलसं करून लसिकरण महत्व समजावुन दिली मोहिमेला गती प्रेशर नाही तर मन जिंका मग मोहिम फत्तेच

प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-आपल्या प्रशासकिय कामाची चुणुक दाखवणार्या वाशिमच्या सिडिपिओ कु.प्रियंका गवळी यांच्या कोरोना प्रतिबंधित लसिकरणाला सर्वञ ऊत्फुर्त प्रतिसाद मिळत असुन सध्या त्या वाशिम जिल्ह्यातील या मोहिमेच्या ‘द ग्रेट शिलेदार’ ठरल्या आहेत.मी मेले तरी चालेल,पण लस घेणार नाही बाई!असा एका आजीचा ठाम निर्धार बघुन गप्प बसुन शांतपणे निघुन जाणार्या कु.प्रियंका गवळी थोड्याच.अहो आजी,मी तुमच्या नातीसारखी आहे आणी नातीचा हट्ट मोडु नये….अशी भावनिक साद घालताच एका आजीने चक्क लस घेतली.
लोकांना आपलसं करुन,लसिचे महत्व पटवून देवून मोहिमेला गती देण्याचं काम कु.गवळी या करीत अाहेत.
कोरोणा विषाणुने संपुर्ण जगतात हाहाकार माजवल्यावर संपुर्ण जनजीवन विष्कळीत झाले.कित्येकांचे जिवही या कोरोणाने घेतले.कोरोणाला प्रतिबंध म्हणून लसिकरण हाच एकमेव पर्याय असल्याने प्रशासनाने सर्व पाञ नागरिकांना मोफत लसिकरण मोहिम राबवून या महामारीविरुध्द लढण्यासाठी सज्ज करणे सुरु केले.प्रशासकीय स्तरावरुन आवाहन करुन लसिकरणासाठी नागरीकांसाठी कॅम्प सुरु केले.परंतु एवढे करुनही नागरिक या लसिकरणासाठी तयार नव्हते.नंतर काही बाबतीत प्रशासनाने कडक भुमिकाही घेवुन बघीतली काहींवर गुन्हेही दाखल केले परंतु नागरिक लस घ्यायला ऊत्सुक नसल्याचेच चिञ पाहायला मिळाले.या सर्व बाबीचा अभ्यास करुन माझ्या जिल्ह्यातील नागरीकांची सुरक्षा हिच माझी जबाबदारी समजुन वाशिमच्या सिडिपीओ कु.प्रियंका गवळी या फिल्डवर ऊतरल्या आणी काय जादु लसिकरणाचा आकडा भरभर वाढला.लसिकरणासाठी अनोखी पद्धत राबवुन लोकांना लसिकरणाचे महत्व पटवुन दिले.लोकांमध्ये मिसळुन,त्यांना आपलसं करुन मोहिमेला गती दिली.
