निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार
चांदूर रेल्वे – धीरज पवार
चांदूर रेल्वे शहरात मतदार यादीच्या दुरुस्तीचा नमुना ८ (अ) चा दुरुपयोग होत असून याबाबतची तक्रार चांदूर रेल्वे शहरातील खडकपुरा येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे तेजस रमेशराव वाट यांनी स्थानिक तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकारी यांच्याकडे २ डिसेंबरला केली.
चांदूर रेल्वे नगरपरिषद हद्दीत मतदार यादीत नावे नोंदविण्याचे व दुरुस्ती करण्याचे काम निवडणूक विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र काही लोकप्रतिनिधी किंवा नागरिक निवडणूक मतदार यादीच्या या प्रक्रियेचा दुरुपयोग करीत आहे. यामध्ये अनेक जण खोटे कागदपत्र सादर करून तसेच कोणताही नागरिकांचा राहण्याचा ठोस पुरावा न जोडता किंवा शपथपत्र न जोडता मतदार यादीत एका प्रभागातून दुसर्या प्रभागात नावे समाविष्ट करण्याचा षडयंत्र सुरू असल्याचे तेजस वाट यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे नमुना ८ (अ) चा पूर्णता दुरुपयोग चांदूर रेल्वे शहरात होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शहानिशा करूनच मतदार यादीतील नाव दुरुस्ती ची कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे तेजस वाट यांनी दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
1)मतदार यादीचा घोळ कधी संपणार ?
चांदूर रेल्वे तालुक्यातील दुबार नावे काढण्यासंदर्भात विविध तक्रारी करण्यात आल्या आहे. परंतु याकडे ही संबंधित प्रशासन ठोस भुमिका बजावत नसल्याचे काही नागरिकांनी म्हटले. तर आता थेट एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात किंवा खेड्या गावातून शहरात नाव सामाविष्ट करण्याचे प्रकार होत असल्याचे या तक्रारीवरून दिसले. त्यामुळे वरिष्ठ प्रशासन याकडे लक्ष कधी देतील ? असा सवाल निर्माण झाला आहे.
2)पडताळणी अंतीच अर्जावर प्रक्रीया – तहसिलदार इंगळे