पत्रकार आरोग्य तपासणी शिबीरास प्रतिसाद,मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशीम:-अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त ३ डिसेंबर रोजी आयोजीत पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला.


अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा ३ डिसेंबर रोजी वर्धापन असल्याने राज्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी करून घ्यावी,अशा सुचना पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी जिल्हा पत्रकार संघांना केल्या होत्या.त्यानुषंगाने वाशीम जिल्हा पत्रकार संघातर्फे आज ३ डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तज्ञ चमुने सर्व प्रथम पत्रकारांची नोंदणी केली.त्यानंतर पत्रकारांची बिपी, शुगर,ईसीजी,
मौखिक,वजन, आरटीपीसीआर इत्यादी तपासण्या करून तसे रिपोर्ट दिले.दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने डॉ.अनील कावरखे यांनी पत्रकारांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप केले.

यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे,शिखरचंद बागरेचा,विश्वनाथ राऊत,नंदकिशोर शिंदे,विठ्ठल देशमुख,गजानन भोयर,साजन धाबे,सुनील कांबळे,अजय ढवळे,गजानन वाघ,सुनील पाटील,राम चौधरी,मदन देशमुख,नंदकिशोर वैद्य,विनोद तायडे,पप्पु घुगे,हरिदास बनसोड,रमेश उंडाळ,रामेश्वर परांडे,प्रमोद लक्रस यांच्यासह बहुसंख्य पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.आरोग्य तपासणी शिबीराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.डि.बी.खेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अनिल कावरखे, डॉ.बी.एस.हरण,
फिजीशीयन डॉ.उमेश मडावी,डॉ.अर्पिता गंडागुळे,वैद्यकीय अधिकारी डॉ.के.फूपाटे,हरिदास मुंढे,डॉ.पेंढारकर,अधिसेविका सरिता चव्हाण,सखु हजारे,विक्रांत काळने,मनोज रत्नपारखी,ईसीजी टेक्निशियन उदय थोरवे,दयानंद उबाळे,कोविड तपासणी विभागाचे नितीन व्यवहारे,संदीप जाधव,वैभव देशमुख,सुजाता राठोड,रिना वानखेडे,नम्रता सरकटे,राहूल कसादे,रामकृष्ण धाडवे,सुनीता जाधव,रक्तपेढी तंत्रज्ञ सचिन दंडे, लक्ष्मण काळे,प्रविण व्यवहारे,गोपाल गावंडे,कोमल साबळे,शंकर कुटे आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!