प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने पेन्शन संघर्ष यात्रेचा शुभारंभ २२नोंव्हेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथुन झाला असुन प्रत्येक जिल्हयात त्या पेन्शन संघर्ष यात्रेचं आगमन होत असुन आपल्या वाशिम जिल्ह्यात दिनांक ०४डिसेंबर रोजी आगमन होणार आहे,तरी या संघर्ष यात्रेचं स्वागत कारंजा या ठिकाणी होणार असुन दुसऱ्या दिवशी सकाळी बाईक रॅली काढुन ती यात्रा पुढे अमरावती च्या दिशेने जाणार असल्याची माहिती जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या पंचायत समिती सभागृह मंगरूळपीर येथे झालेल्या बैठकीत देण्यात आली.

या बैठकीला जिल्ह्यातील पांडुरंग कोठाळे, विजय मनवर ,अनिल मडके,विजय सोनुने,विजय राठोड,सतिष सांगळे,विनोद मनवर ,नितीन काळे ,अतुल गावंडे,केशव अंजनकर ,रा सु इंगळे,राजु मते,गजानन राऊत ,नारायण डुंबे,वा का महल्ले,अजय कटके,सुनिल ठाकरे ,पांडुरंग कोल्हे,,योगेश गवई,सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत त्यांना पेन्शन संघर्ष यात्रेची माहिती दिली ,तसेच या पेन्शन संघर्ष यात्रेचं ०४ आणि ०५ तारखेचं संपुर्ण नियोजन देण्यात आले.वाशिम जिल्ह्यातील जास्तीत जास्त संख्येने डीसीपीएस एनपीएस धारकांनी उपस्थित राहुन संघर्ष यात्रेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जुनी पेन्शन हक्क संघटनेचे बालाजी मोटे,विनोद काळबांडे,गोपाल लोखंडे,अनिल मडके,निलेश कानडे,श्रीकांत बोरचाटे,संदिप महाले शिवाजी नवघरे ,कैलास वानखेडे,निलेश म्हतारमारे,किशोर कांबळे,सचिन सवडतकर,अमर शिंदे ,अंगद जाधव,श्रीपाद शिंदे,प्रविण मोरशे यांनी केले.
