जागतिक एड्स दिना निमित्त पोस्टर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन चे आयोजन

प्रतिनिधी ओम मोरे :-

जागतिक एड्स दिना निमित्त पोस्टर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन चे आयोजन
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती संलग्नित, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथील राष्ट्रिय सेवा योजना विभागा व्दारे स्थापित रेड रिबन क्लब, व ICTC, जिल्हा सामान्य रुग्णालय , अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयांमध्ये पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व महाविद्यालयातील बी.ए ,बी .कॉम च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला .पोस्टर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन चे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ.वर्षा चिखले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ महेंद्र मेटे प्रमुख वक्ते, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एड्सविषयी जनजागृती युवकांकडून समाजामध्ये होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. तसेच डॉ मनोज जगताप, वाणिज्य विभाग प्रमुख हे प्रमुख उपस्थितीत होते. अध्यक्षस्थानी डॉ वर्षा चिखले यांनी अध्यक्षीय वक्तव्य करीत रासेयोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एड्स जनजागृती व स्वयंशिस्त निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ .ज्ञानेश्वर नामुर्ते रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार डॉ सुवर्णा गाडगे महिला कार्यक्रम अधिकारी यांनी केले.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या पोस्टर कॉम्पिटिशन चे आयोजन यशस्वी करण्यासाठी डॉ ज्ञानेश्वर नामुर्ते कार्यक्रम अधिकारी व डॉ सुवर्णा गाडगे महिला कार्यक्रम अधिकारी, श्री गजेंद्र बेलसरे ,सौ. आरती इंगळे जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती यांच्यासह सुमित रिटे,मोरेश्वर मह्लले, शुभम उके , तेजस फुलके, शुभम करताले, विशाल पवार, कु.आरती राठोड, कु जान्हवी राऊत, कू,राणी जाधव, दिव्या सापधरे आणि इतर विद्यार्थ्यांनी भरघोस सहकार्य केले .याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. जयराम गायकवाड, डॉ बबन झरे, डॉ. जी जी.भरती, डॉ. किशोर साबळे , डॉ वैशाली देशमुख, डॉ, संगीता भुयार, डॉ अपर्णा सरोदे तसेच बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी पोस्टर प्रेझेंट बघण्यासाठी उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!